⚡मालवण ता.०२-:
मालवण तहसील कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते महसूलच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, महसूल नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, संजय गांधी योजना नायब तहसीलदार प्रिया परब, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिला निकस यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
महसूल सप्ताहानिमित्त सात दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.