⚡बांदा ता.०२-: बांदा येथे फर्शीचे काम करणाऱ्या सेंट्रिंग कामगाराला कट्टा कॉर्नर चौकात त्याच्या दोन सहकारी कामगारांनी बेदम चोप देत त्याच्याकडील १२ हजार रुपये लांबविले तसेच त्याच्याच मोबाईलवरून कुटुंबियांना खोटी माहिती देत २ लाख रुपयांची मागणी केली. ही घटना घडून तीन दिवस उलटले तरीही बांदा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचे दिनेश कुमार यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी तक्रार अर्ज लिहिला असून त्यात त्यांनी सविस्तर घटनाक्रम लिहिला आहे. मात्र हा अर्ज स्वीकारण्यास देखील पोलिसांनी नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरची घटना ही ३० जुलै रोजी बांदा उड्डाणपूलाखाली घडली आहे. त्यांनी अर्जात म्हटले आहे की, माझे सहकारी असलेले व फर्शीचे काम करत असलेले राकेश यादव व गोपाळ स्वामी यांनी आपल्याला मारहाण करत आपल्याकडील रोख १२ हजार रुपये काढून घेतले. तसेच माझा मोबाईल घेत माझ्या गुगल पे अकाउंटवरून ३ हजार २०० रुपये आपल्या खात्यात वळविले. माझा मोबाईल वापरून माझा अपघात झाल्याची खोटी माहिती माझ्या कुटुंबाला देत त्यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
बांदा पोलीस ठाण्यात गेले ३ दिवस सातत्याने जाऊनही पोलीस तक्रार तक्रार घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव मला जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तेथे तक्रार दाखल करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सेंट्रिंग कामगाराला कट्टा कॉर्नर चौकात दोन सहकारी कामगारांनी बेदम चोपल…
