⚡मालवण ता.०२-:
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने क्रांती सप्ताह साजरा करत लायन्स क्लब मालवणच्या वतीने रेवतळे येथील फाटक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले तसेच टिळक यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत गट पहिला (इयत्ता दुसरी- तिसरी)- प्रथम – हार्दिक महेश दाभोलकर, द्वितीय – नीरजा हेमंत चव्हाण, तृतीय – माही नितेश नरे, गट दुसरा – (इयत्ता चौथी -पाचवी)- प्रथम – पर्णिका प्रताप चिपकर, द्वितीय – दूर्वा निलेश शिरोडकर, तृतीय – अर्णव अमर वाघमारे, उत्तेजनार्थ – आराध्य नारायण पराडकर, वेदांत किशोर बांदेकर या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, लायन्स सदस्य विश्वास गावकर,मुकेश बावकर, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, ऋग्वेदा धामापूरकर, राधिका मोडकर, फेनी फर्नांडिस, शिक्षक देविदास प्रभुगांवकर, महादेव घोडके, वर्षा परब आदी उपस्थित होते.