⚡कुडाळ,ता.०२-: राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ क्र. ०२ च्या पथकाने आज पिंगुळी येथे एका खासगी वाहनातून गोवा बनावटी दारूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ३३ बॉक्स दारू आणि अल्टो कार (क्र. एम.एम/एच-२२०७) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनचालक बस्त्याव सायमन गोन्स्लावीस (वय २२, रा. होडावडा, ता. वेंगुर्ला) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कुडाळमध्ये गोवा बनावटी दारूचा मोठा साठा जप्त; एकजण ताब्यात…
