Headlines

कट्टा महाविद्यालयामार्फत मुंबई विद्यापीठांतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रथम सत्र कार्यशाळेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन…!

⚡मालवण ता.०२-:
मुंबई विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी कट्टा महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची प्रथम सत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेस मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रा. डॉ. कुणाल जाधव, डॉ. सचिन राऊत, डॉ. शुभम सोनवणे, श्री. किरण पाटील, श्री आलोक बच्चाव व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय समन्वयक इत्यादी मान्यवर अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागा अंतर्गत राबविण्यात येणारे अन्नपूर्णा योजना, वृद्धांच्या व स्त्रियांच्या समस्या, करिअर प्रोजेक्ट यासारखे समाजाभिमुख उपक्रम, तसेच महाविद्यालयीन स्तरीय राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम व त्यांचे मूल्यमापन याबाबत मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सदर कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक, प्राध्यापक व २ विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी व महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. वैशाली पालव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page