आम. निलेश राणे यांनी घेतला आढावा..
⚡मालवण ता.०२-: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पंचायत समितीने शंभर टक्केपेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करत अग्रेसर राहून आदर्शवत असे काम केले आहे. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वात मालवण पंचायत समितीची ही भरारी सर्वच क्षेत्रात राज्य व देशपातळीवर नावलौकिक करावी. आमदार म्हणून आपण सदैव सोबत आहोत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण पंचायत समिती येथे बोलताना व्यक्त केले.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६ अंतर्गत मालवण पंचायत समितीने ११८ टक्के पेक्षा जास्त टार्गेट पूर्ण केले आहे. जिल्हा स्तरापेक्षा दुप्पट अशी ही भरारी आहे. या संपूर्ण कामाचा आढावा आमदार निलेश राणे यांनी पंचायत समिती येथे उपस्थित राहून गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडून घेतला. तसेच या अभियानात आपला अभिप्रायही नोंदवला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत विविध घाटकांतून १ हजार गुण निश्चित करण्यात आले आहेत. यात क्षेत्रीय स्तरावरील निरीक्षणे, कुटुंब स्तर सर्वेक्षण, शाळा अंगणवाडी, पंचायत, घर, बाजार, सार्वजनिक शौचालय, आरोग्य सुविधा, तीर्थ क्षेत्र येथील स्वछतेची पडताळणी, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोवर्धन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प यांची कार्यात्मता पडताळणी, कुटुंबाची चर्चा मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून प्रतिसाद जाणून घेतले जात आहे. यासह अन्य सर्व निकषात मालवण पंचायत समिती अग्रेसरपणे जिल्ह्यात कार्यरत आहे, असा आढावा यावेळी घेण्यात आला.