युवतीची छेड काढणाऱ्या वृद्धाला मुलींकडून चोप…

सावंतवाडी शहरातील घटना: संबंधित वृद्ध पोलिसांच्या ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील एका महाविद्यालयीन युवतीची छेड काढल्यान एका वृद्ध व्यक्तीस तेथे उपस्थित असलेल्या काही मुलींनी चांगलाच चोप दिल्याची घटना आज सायंकाळी सुमारे सव्वा पाचच्या सुमारास सावंतवाडी शहरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध व्यक्तीने एका कॉलेज युवतीशी गैरवर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील इतर मुलींनी संताप व्यक्त करत त्या वृद्ध व्यक्तीस जाब विचारला. यानंतर काही मुलींनी त्याला चांगलाच प्रसाद दिला.दरम्यान संबंधित वृद्ध व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

You cannot copy content of this page