⚡सावंतवाडी, ता.०५-: भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर प्रवक्तेपदी अँड.सिद्धार्थ भांबोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्या शिफारशीनुसार तसेच पालकमंत्री यांच्या आदेशानंतर भांबोरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ भांबोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
