Headlines

भुविकास बॅंकचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश कासले यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी

वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या कोळंब कातवड येथे वास्तव्यास असलेले भुविकास बॅंकचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (62) यांचे सोमवारी संध्याकाळी उपचारादरम्यान पडवे येथे निधन झाले. भारतीय बोद्ध महासभा गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या पच्छात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई नातवंडे, भाऊ, भावजय, बहीण, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीचे मालवण समतादूत आणि पत्रकार संग्राम कासले तसेच मालवण न्यायालयातील कनिष्ठ लिपिक सुविधा जाधव यांचे ते वडील होत. विवेक जाधव यांचे ते सासरे होत.

सतीश कासले यांच्यावर अंत्यसंस्कार मालवण बाजारपेठ स्मशानभुमी येथे सकाळी अकरा वाजता होणार आहेत

You cannot copy content of this page