Headlines

कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल…

▪️सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार:सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार.. ⚡कणकवली ता.०२-: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे याची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात…

Read Full News

सेंट्रिंग कामगाराला कट्टा कॉर्नर चौकात दोन सहकारी कामगारांनी बेदम चोपल…

⚡बांदा ता.०२-: बांदा येथे फर्शीचे काम करणाऱ्या सेंट्रिंग कामगाराला कट्टा कॉर्नर चौकात त्याच्या दोन सहकारी कामगारांनी बेदम चोप देत त्याच्याकडील १२ हजार रुपये लांबविले तसेच त्याच्याच मोबाईलवरून कुटुंबियांना खोटी माहिती देत २ लाख रुपयांची मागणी केली. ही घटना घडून तीन दिवस उलटले तरीही बांदा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचे दिनेश कुमार यांनी सांगितले.याबाबत त्यांनी…

Read Full News

सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर रजेवर…

प्रतीक महाडवाला यांच्याकडे तात्पुरता कार्यभार.. ⚡मालवण ता.०२-:मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर रत्नागिरी येथील कार्यालयाचा पदभार मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जि. द. सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त…

Read Full News

फ्लॉवर पेटल स्पर्धेने रिगल कॉलेज कणकवलीचा परिसर फुलांच्या सौंदर्याने नटला…

विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा उच्चांक गाठत फुलांच्या पाकळ्यातून साकारल्या मनमोहक कलाकृती.. ⚡कणकवली ता.०२-: रिगल कॉलेज कणकवली येथे पार पडलेल्या फ्लॉवर पेटल स्पर्धेने संपूर्ण परिसर फुलांच्या सौंदर्याने नटला . विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा उच्चांक गाठत फुलांच्या पाकळ्यातून मनमोहक कलाकृती साकारल्या. या स्पर्धेत एकूण १४ गटांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये “मदनमंजिरी”, “रातराणी”, “फ्लॉवर क्वीन”, “कुरुक्षेत्र”, “सांजधारा”, “पेटल्स ऑफ पावर्स”, “रायझिंग स्टार”…

Read Full News

सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड इ टॉयलेट चे लोकार्पण पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण…

⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून शहरातील उड्डानपुलाखाली बसविण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड इ टॉयलेट चे लोकार्पण सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत…

Read Full News

कणकवलीत ४ ऑगस्टला कर्करोग मोबाईल व्हॅन येणार…

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजानिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन सोमवार, ४ ऑगस्टला कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होणार आहे. ही व्हॅन या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वा. पर्यंत असणार आहे. या व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीच्या विविधा सुविधा उपलब्ध असणार आहेत. यात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग या तपासण्यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपेक्षा…

Read Full News

सावंतवाडीत स्मार्ट मीटर सक्तीविरोधात ४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीचे जनआंदोलन…

नागरिकांना सहभागाचे आवाहन: सर्वपक्षीय व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०२-: स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वाढीव वीजबिलांच्या विरोधात सावंतवाडीतील नागरिक येत्या सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन करणार आहेत. सर्वपक्षीय सह संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सरकारने गावाकऱ्यांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी, ही त्यांची प्रमुख मागणी…

Read Full News

मालवणात महसूल दिन साजरा…

⚡मालवण ता.०२-:मालवण तहसील कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते महसूलच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, महसूल नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, संजय गांधी योजना नायब तहसीलदार प्रिया परब, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिला निकस यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.महसूल सप्ताहानिमित्त सात दिवस विविध उपक्रमांचे…

Read Full News

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये मालवण पंचायत समिती अग्रेसर…

आम. निलेश राणे यांनी घेतला आढावा.. ⚡मालवण ता.०२-: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पंचायत समितीने शंभर टक्केपेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करत अग्रेसर राहून आदर्शवत असे काम केले आहे. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वात मालवण पंचायत समितीची ही भरारी सर्वच क्षेत्रात राज्य व देशपातळीवर नावलौकिक करावी. आमदार म्हणून…

Read Full News

तो देशासाठी, मी घरासाठी – सैनिक व पोलिसांच्या पत्नी-मातांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेताळ पतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी सैनिक व पोलिस यांच्या पत्नी आणि मातांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पती किवा पुत्र देशसीमेवर, किवा समाजरक्षणाच्या जबाबदारीत व्यस्त असताना, या स्त्रियांनी घर, जबाबदा-या, भावनिक संघर्ष, अपार धैर्य आणि समर्पण यांची जबाबदारी समर्थपणे…

Read Full News

You cannot copy content of this page