मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ मंजूर…

पश्चिम महाराष्ट्राच्या ३८ वर्षांच्या संघर्षाला यश..

⚡सावंतवाडी ता.०१-: कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील वकिलांनी गेल्या ३८ वर्षांपासून केलेल्या अथक संघर्षानंतर ही मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर येथील कृती समितीच्या बैठकीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व वकिलांनी प्रचंड जल्लोष करत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आभार मानले आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आणि वकिलांना मुंबई उच्च न्यायालयात खटल्यांसाठी जावे लागत होते, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होत होता. कोल्हापूर येथे खंडपीठाची मागणी ही केवळ वकिलांची नसून, न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची देखील होती. या मागणीसाठी अनेक आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देण्यात आली होती.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लोकांना आता स्थानिक पातळीवरच उच्च न्यायालयाच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळेल आणि सर्वसामान्यांचे कष्ट कमी होतील. या ऐतिहासिक निर्णयाचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.

You cannot copy content of this page