⚡कणकवली ता.०७-: राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत वागदे मंडळात शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा व दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा परिषद सदस्या शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, अक्षता राणे यांच्यासह वागदे मंडळातील सर्व सरपंच, महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते.
शिबिरात विविध गावांतील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले तसेच रेशनकार्डांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर आणि तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी वागदे सरपंच यांनी राज्य सरकार तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे कमी कालावधीत लाभार्थ्यांना आवश्यक दाखले उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. वागदे मंडळातील मंडळ अधिकारी किरण गावडे व तलाठी श्रद्धा कोरगावकर यांनी शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली.
