महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा कोकणचा विकासपथ ठरेल…

प्रभाकर सावंत:सिंधू रत्न समृद्धी योजना पुढील तीन वर्षासाठी कायम करण्यात असल्याने जिल्ह्याला मोठा फायदा होणार..

⚡ओरोस ता ७-: सर्व घटकांना समावेश करणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या हा अर्थसंकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देईल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कित्येक वर्षापासून सुरू असलेली सिंधू रत्न समृद्धी योजना ही पुढील तीन वर्षासाठी कायम करण्यात आली असल्याने, या मुदतवाढीचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्याचे पर्यटन, मत्स्य विकास, फलोत्पादन, ग्रामविकास, सूक्ष्म उद्योग कौशल्य विकास अशा आधारीत अनेक घटकांना याचा फायदा होईल. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी १२०० कोटीची तरतूद करण्यात आली. या योजनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळून मच्छीमार बांधवांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, मजूर, महिला, कष्टकरी, मच्छिमार बांधव आणि विद्यार्थी यांच्या समक्षीकरणावर भर देण्यात आला आहे.
या सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी भरघोस तरतूद तर करण्यात येणार आहेच. पण यासोबत महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, 25 लाख लखपती दीदी करण्याची तरतूद करण्यात आली. याचाही फायदा आपल्या जिल्ह्यातील बहिणींना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना जाहीर करण्यात आल्याने दोन लाख पर्यंत कर्ज घेतलेल्या २०२५ पर्यंतच्या थकीत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
बांबू विकास प्रकल्प ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कल्याणकारी ठरेल. ५० हजार कोटींची गुंतवणूक करून पाच लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पातही ५ ते ७ टक्के बांबू बायोमास वापराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोकणातील साकव बांधणीसाठी तसेच दुरुस्तीसाठी ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी मिळाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा चार अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या- वस्त्या बारमाही रस्त्याने जोडण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा जपण्याच्या कार्यक्रमांतर्गत युनोस्कोच्या यादीतील बारा गडकिल्ल्यांमधील सिंधुदुर्गातील राजकोटचा विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारची अर्थ संकल्पावर प्रतिक्रिया देतानाच प्रभाकर सावंत यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात “जब इरादा लिया उची उडान का, फिर देखना फिजुल है कद आसमान का”, असे सांगितले.

फोटो:- प्रभाकर सावंत

You cannot copy content of this page