⚡सावंतवाडी ता.०७-: “देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका, गरिबांना जेवू घाला आणि स्वच्छता पाळा,” असा रोकठोक संदेश देणारे आधुनिक युगातील महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून, पी.एम. श्री कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (सावंतवाडी नं. २) येथे ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या चिमुकल्यांनी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.
यामध्ये प्रथम क्रमांक: प्रियांशी गुप्ता (ट्रॉफी प्रदान),द्वितीय क्रमांक: अरहान शेख,तृतीय क्रमांक: कबीर परब आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर, भावना गावडे, प्राची ढवळ, पूजा ठाकूर, रणजीत सावंत, हेमांगी जाधव, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतनीस अमिषा सासोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व शिक्षक वृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी गाडगे बाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, त्यांनी हाती झाडू घेऊन समाज कसा स्वच्छ केला, याचे प्रेरक दाखले विद्यार्थ्यांना दिले. ‘मुलांच्या मनात स्वच्छतेची सवय बालवयातच रुजली, तरच उद्याचा भारत सुंदर होईल,’ असा सूर यावेळी व्यक्त झाला.
चौकट
चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अंगणवाडी व प्राथमिक गट: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’ या विषयावर आकर्षक रंगकाम केले.
इयत्ता ३ री ते ५ वी या गटातील विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. “स्वच्छता पाळा, रोगराई टाळा” अशा घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला होता.
केवळ स्पर्धाच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी स्वतःचे बाके आणि वर्ग परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा प्रत्यक्ष धडा गिरवला.
या निमित्ताने आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
