Headlines

ओबीसी मोर्चा बांदा मंडल अध्यक्षपदी संदीप नेमळेकर यांची नियुक्ती…!

⚡सावंतवाडी ता.०९-: ओबीसी मोर्चा बांदा मंडल अध्यक्षपदी संदीप नेमळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांना उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महेश धुरी, स्वागत नाटेकर, सचिन बिरजे, मधुकर देसाई, पालव, आदी यावेळी उपस्थित होते,

Read Full News

कुडाळ हायस्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा…

कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समितीचे आयोजन.. कुडाळ : कायदेविषयक जनजागृती शिबीर कार्यक्रमांतर्गत कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळ येथे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि POCSO Act या विषयावर मान्यवर विधिज्ञांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम कुडाळ हायस्कूल जूनियर…

Read Full News

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’…

प्रभाकर सावंत:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.. ⚡ओरोस ता ८-: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. ‘सेवा…

Read Full News

सामाजिक बांधिलकी माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदे समोरील एकूण 35 खड्डे बुजविले…!

⚡सावंतवाडी ता.०८-: आठ दिवसापूर्वी सावंतवाडीनगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले होते की आठ दिवसात सावंतवाडी बाजारपेठ व आरपीडी हायस्कूल रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सदर खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशारा दिला होता परंतु नगरपरिषदे कडून कुठच्याही प्रकारचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपून…

Read Full News

मालवणात डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रम…

⚡मालवण ता.०७-:गणेशोत्सवानिमित्त डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने मालवण बंदर जेटी या विसर्जनस्थळी निर्माल्यापासुन खत निर्मिती हा उपक्रम राबवून सुमारे एक टन निर्माल्य जमा करण्यात आले. अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी मालवण बंदर जेटी येथे डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. हा उपक्रम संध्याकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत राबविण्यात आला. या…

Read Full News

मालवणमध्ये गणपती विसर्जनासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम..

⚡मालवण ता.०७-:यंदाच्या गणेशोत्सवात वादळी वातावरणामुळे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जन करणे भाविकांसाठी आव्हान बनले असताना विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि आतू फर्नांडिस मित्र मंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला. त्यांनी बंदर जेटी किनाऱ्यावर एक विशेष पथक कार्यरत ठेवताना दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या गणपती मूर्तींचे मोफत आणि…

Read Full News

मालवणात मीनाताई ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी…!

⚡मालवण ता.०७-:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची पुण्यतिथी शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, महिला उपतालुकाप्रमुख पूजा…

Read Full News

मालवण कसाल राज्य मार्गावर आराम बस व मोटरसायकल अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार…!

⚡ओरोस ता ७-: मालवण कसाल राज्य मार्गावरील रानबाबुळी येथे आराम बस आणि मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार गणेश चंद्रकांत घोगळे (रा वराड ता. मालवण) हा २८ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्यामागे बसलेली तरुणी जखमी झाली आहे. दरम्यान, नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह रस्त्यावरच होता. यामुळे…

Read Full News

सीबीएसई साऊथ झोन क्रिकेट स्पर्धेत भोसले स्कूलची चमक…

⚡सावंतवाडी ता.०६-: राहटा-अहिल्यानगर येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे. स्पर्धेत दहावीतील पलाश प्रितम वाडेकर व आठवीतील संकेत राजेंद्र राणे यांनी सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय संघात स्थान निश्चित केले आहे._ निवड चाचणीत १४, १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटातील…

Read Full News

गरड परिसरात रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात…

रात्री पावणे बाराची घटना: दुचाकीस्वार गंभीर, तर रिक्षाचे मोठी नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे दरम्यान यात रिक्षाचे मोठे प्रमाण नुकसान…

Read Full News

You cannot copy content of this page