⚡सावंतवाडी ता.०८-: आठ दिवसापूर्वी सावंतवाडी
नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले होते की आठ दिवसात सावंतवाडी बाजारपेठ व आरपीडी हायस्कूल रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सदर खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशारा दिला होता परंतु नगरपरिषदे कडून कुठच्याही प्रकारचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपून शाळा – महाविद्यालये सुरू झाल्याने सदर खड्ड्यांनमुळे वाहन चालकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना अडथळा होऊ नये त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे कोणाचाही अपघात होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुन्हा एकदा पहाटे चार वाजेपर्यंत खड्डे बुजवण्यात आले.
सदर खड्डे बुजवण्यासाठी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक बबन डिसोजा यांनी खडी व वाळू पुरवली तसेच सिमेंट व लेबरचार्ज सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी यासाठी खर्च केला.
भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी पावसापूर्वी स्वखर्चाने भटवाडी येथील रस्त्याच्या बाजूला धोकादायक व जीर्ण झालेली झाडे स्वखर्चाने तोडून घेतली होती त्यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मोठे योगदान आहे.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा, राज्य माहिती आयोग अधिकारी सुशील चौगुले व बांधकाम व्यवसायिक दादा नग्नूर तसेच त्यांचे कामगार समीर यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.