चौके ग्रामपंचायतीसाठी २५ लाखांचा निधी…

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न; दत्ता सामंत..

⚡मालवण ता.२५-:
चौके गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करणार तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी चौके ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना दिली.

चौके ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ अक्षता गावडे आणि पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पी.के. चौकेकर होते तर व्यासपीठावर माजी सरपंच राजा गावडे, सुरेश चौकेकर सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी , उद्योजक नाना आंबेरकर आदी उपस्थित होते .

प्रारंभी सरपंच पी.के चौकेकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले
यावेळी बोलताना श्री दत्ता सामंत यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे विकास काम करताना कोणत्याही प्रकारचे अडचण भासणार नाही आपण सुचवलेल्या कामांचा आराखडा तयार ठेवा तसेच भराडी मंदिर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निधीची उपलब्धता निश्चित केली जाईल तसेच ग्रामीण भागात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत विशेषतः त्यामुळे प्रत्येक गावात आरोग्य शिबीर आयोजित करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरजूंना मदत आपण करणार असे सांगितले तर मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी प्रशासकीय स्तरावरून सहकार्य करण्याची ग्वाही दिली .
यावेळी अक्षता गावडे, मानसी भोगावकर, माजी सरपंच सुरेश चौकेकर, बिजेंद्र गावडे,सदाशिव गावडे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री दत्ता सामंत गटविकास अधिकारी श्री चव्हाण, माजी सरपंच राजा गावडे यांचाही सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी श्री निकम यांनी आभार मानले कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे,माजी सरपंच मधुकर चौकेकर ,सचिन आंबेरकर तसेच मंगेश पात्रे, मोहन गावडे ,दीनानाथ गावडे रमाकांत देसाई बंड्या गावडे, श्रीमती निरा सावंत, उदय गावडे विनायक गावडे चिरेखान संघटनेचे अध्यक्ष दत्ता गावडे, प्रमोद भोगावकर, पोलीस पाटील रोहन चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page