बॅनरवर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांचा फोटो:माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या बॅनरतून “संदेश”..

⚡कणकवली ता.०९-: कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत शहर विकास आघाडीच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत आणि आ. निलेश राणे यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. यावेळी कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपण घेत असल्याचे अभिवचन त्यांनी प्रचारसभांमधून दिले होते. आता याच अभिवचनाची आठवण करून देणारा एक लक्षवेधी बॅनर कणकवली शहरात साहेब , आपल्या नजरेतील कणकवलीचा विकास प्रत्यक्षात साकार करुया …! अशा आशयाचे बॅनर लावत खुद्द नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे बंधु माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या फलकातून “संदेश” देण्याचा प्रयत्न केला आहे. बॅनर लागताचा राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या विकासाबाबत जी आश्वासने जाहिर प्रसार सभांमध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व आ. निलेश राणे यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या बॅनरला राजकीयदृषट्या महत्व प्राप्त झाले आहे. कणकवलीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी विश्वास ठेवला. शहरविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये विविध नेत्यांनी नागरिकांना दिलेला विकासाचा शब्द पाहून मतदान झाले. परंतु, आता विकासाची जबाबदारी असल्याने या बॅनरची चर्चा होवू लागली आहे. शहराच्या विकासाला गती मिळावी आणि कणकवलीचा नियोजनबद्ध विकास व्हावा, असा संदेश या बॅनरमधून देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
