ॲड. सिद्धार्थ भांबुरे:व्यापारी संकुलातील गाळ्यांवर नगराध्यक्ष असताना कारवाई का केली नाही? २५ वर्षे सत्ता कुणाची होती? भांबुरे यांचा सवाल; चर्चेचे आव्हान स्वीकारले, पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांची बाजू मांडली..
सावंतवाडी : नगरपरिषद सत्ताधाऱ्यांवर संजू परब यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. अभ्यासू असणं अन् स्वयंघोषित अभ्यासू असणं यात फरक आहे. उपनगराध्यक्ष अभ्यासू आहेत हे तरी श्री. परब यांनी मान्य केले आहे. नागरिकांत गैरसमज पसरविण्याचे काम ते करत आहेत असा आरोप भाजप प्रवक्ते नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केला. तसेच व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत नगराध्यक्ष असताना संजू परब यांनी कारवाई का केली नाही ? २५ वर्ष सत्ता कुणाची होती ? की आपल्याच सर्वोच्च नेत्याची राजकीय कोंडी ते करत आहेत असाही सवाल ॲड. भांबुरे यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. भांबुरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांवर संजू परब केलेले आरोप चुकीचे आहेत. आपल्यावर विश्वास असल्याने जनता आपल्याला निवडून पाठवते. मात्र, मागच्या दोन्ही बैठकांना एकदा सभात्याग करून व कालच्या वेळी कारण न देता ते गैरहजर राहिले. सभेची नोटीस, टीपण सर्व सदस्यांना आगाऊ दिली जाते. अभ्यासू असणं अन् स्वयंघोषित अभ्यासू असणं यात फरक आहे. नगरसेवकांना दिलेली टीपणी ही प्रशासनाकडून आलेली असते. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या सहीने आलेल्या टीपणीत काटछाट करणं शक्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला. तर संजू परब सभागृहात हजर राहिले असते तर त्यांना कामकाज समजलं असतं. मात्र, ते केवळ नागरिकांची दिशाभूल करत आहेत असा टोला ॲड. भांबूरे यांना हाणला.
दरम्यान, उपनगराध्यक्ष अभ्यासू आहेत हे संजू परब यांनीच मान्य केले आहे. श्रेयस मुंज यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी माहिती मागवली होती. मात्र, सर्वच माहिती प्रशासनाकडून दिली गेली. तक्रार अनुषंगानेच कारवाईची मागणी आम्ही देखील केली होती. कदाचीत सभागृहातील सर्व माहिती संजू परब यांच्यापर्यंत पोहचत नसेल. तर या प्रकाराला २५ वर्ष झाली अस महणताना २०१९ ला ते नगराध्यक्ष होते. मग, त्यावेळी का कारवाई केली नाही ? त्यापूर्वी २५ वर्ष सत्ता कोणाची होती ? की संजू परब यांना आपल्या सर्वोच्च नेत्याची राजकीय कोंडी करायची आहे ? असा सवाल केलाय.
संजू परब यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसतो. सभागृहात एक अन् प्रेस समोर एक अशी त्यांची भुमिका दिसते. त्यांनी आम्हाला चर्चेच आव्हान केल. आम्ही देखील चर्चेला यायला कधीही तयार आहोत. पण, लोकांनी आम्हाला आमने-सामने येण्यासाठी निवडलं नसून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपणाला निवडून दिलंय यांचंही भान ठेवणं आवश्यक आहे. सभागृहात संजू परब यांनी आपली भूमिका मांडावी असेही ते म्हणाले. तर राजकारण हे प्रसिद्धच साधन नसून महायुती असून देखील काही गोष्टींकडे संजू परब दुर्लक्ष करत आहेत अशी टीका त्यांनी केली. तर पाणी पुरवठा सभापतींना क्लिनचीट दिली असं नगराध्यक्षांनी कुठेही म्हटलेलं नाही. चौकशी व्हावी अशी आमचीही इच्छा आहे. सभापतींनी तपासात अडथळा नको म्हणून राजीनामा दिलाय. यावर चौकशी होऊन प्रशासकीय कारवाई होईल, तो अधिकारी जिल्हाधिकारी यांचा आहे अशी माहिती ॲड. भांबुरे यांनी दिली. यावेळी सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

