नियंत्रण सुटल्याने रोलर दहा फूट खोल दरीत…

तारामुंबरीत सुदैवाने जीवितहानी टळली, चालकाने उडी मारून वाचविले प्राण..

⚡देवगड ता.२५-:
तारामुंबरी येथील रस्त्याचे काम सुरू असताना चढ रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने रोलर न्युटड्ढल होवून मागे येत रस्त्यानजिक सुमारे १० फुट खोल भागात कलंडून तेथिल एका घरासमोर अपघातग्रस्त झाला.सुदैवाने घराच्या अंगणात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.तर चालकाने प्रसंगावधान राखून रोलरमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.ही घटना बुधवारी दुपारी २.३० वा.सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनूसार, तारामुंबरी गावाकडे जाणाèया रस्त्याचा काम गेले काही दिवस सुरू आहे.हा रस्ता चढ-उताराचा आहे.रस्त्याचा डांबरीकरण कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून रोलर व इतर सामुग्री तेथे आणण्यात आली आहे.बुधवारी दुपारच्या सुमारास डांबरीकरणाचे काम सुरू असताना रोलर चढ रस्त्याने जात असताना अचानक रोलर न्युटड्ढल होवून चालकाचे नियंत्रण सुटले व हा रोलर रस्त्यावरून मागे येत थेट रस्त्यानजिकच्या खोल भागात कलंडला.या भागात ज्ञानदीप केळूसकर यांच्या मालकीचे घर आहे.या घरात त्यांची आई एकटी राहत असून ती घटनेदरम्यान घराच्या मागील बाजूस होती.रोलर त्यांच्या घराच्या अंगणात कोसळल्याने मोठा आवाज झाला.त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातग्रस्त रोलरच्या चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ रोलरमधून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले.त्याला कोणतीही दुखापत झाली नाही तसेच केळूसकर यांच्या अंगणातही घटनेदरम्यान कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.या घटनेत रोलरचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत देवगड पोलिस स्थानकात नव्हती.

You cannot copy content of this page