वेंगुर्ला येथे आंबा-काजू बागायतदार शेतकरी यांचा उद्या भव्य मोर्चा…

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्या नेतृत्वाखाली होणार भव्य एल्गार..

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व आंबा-काजू बागायतदार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक वेंगुर्ला श्री देवी सातेरी मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेत आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत गुरुवार दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता शेतकरी आंबा-काजू बागायतदारांचा भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उभादांडा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी दिली. हा शेतकरी भव्य
मोर्चा वेंगुर्ला एस.टी. डेपो ते तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला व कृषी विभाग वेंगुर्ला पर्यंत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात बागायतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच आपल्या मागण्यांसाठी एकत्र येण्याचे आवाहन वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना अध्यक्ष तथा उभादांडा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव एम. के. गावडे, प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर, शिवराम आरोलकर, विजय सरमळकर, चेतन कुबल, सौरभ कुबल, स्वप्निल शिरोडकर, भूषण नाबर, पांडू गावडे, बबन साळगावकर,
नागेश ऊर्फ पिंट्या गावडे, रवींद्र धुरी, न्हानु वराडकर, लक्ष्मण गावडे, सखाराम ठाकूर, वृषाल ठाकूर, स्वप्निल गडेकर, कृष्णकुमार सरमळकर, सागर गडेकर, महेश परब, सतीश तांबोसकर, विलास नाईक, गजमुख गावडे, भास्कर गावडे, योगेश गावडे, गुरुनाथ वेंगुर्लेकर, देव गावडे, मंदार गावडे, नितेश मयेकर आदी आंबा-काजू बागायतदार उपस्थित होते. या मोर्चामध्ये बागायतदार आपल्या वाहनांसह मोठ्या संख्येने सहभागी होणार असून शासनाने तात्काळ बागायतदारांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page