⚡वेंगुर्ला ता.२५-:
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग 2 वर्षे पुरस्कार प्राप्त करणार्या वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतचा आज बुधवारी (25 फेब्रुवारी ) कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर आयुक्त माणिक दिवे, सहाय्यक अप्पर आयुक्त प्रदीप घोरपडे, सिडकोचे व्यवस्थापक राजाराम दिघे आदी प्रमुख मान्यवरासह वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, दिनेश पाटकर, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, स्वच्छ भारत मिशन च्या अक्षता नाईक, माजी सरपंच श्वेता चव्हाण, माजी उपसरपंच मनीषा नेवाळकर , सदस्य सुनील चव्हाण, शांताराम पेडणेकर, सीमा सावंत, नमिता परुळेकर तसेच सुधीर पेडणेकर, अश्विनी चव्हाण, शंकर घोगळे आदी सन्मान कार्यक्रमांस उपस्थित होते. परुळेबाजार ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक सन 2019/20 व 2020 21 तसेच 2021 22 अशी सलग दोन वर्षे यश संपादन केले आहे. सलग दोन वर्षे अभियान अंतर्गत पुरस्कार मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतिच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी यांचे वेंगुर्ला तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
वेंगुर्ला – परुळेबाजार ग्रामपंचायतीचा बेलापूर येथे पुरस्कार देऊन विशेष सन्मान…
