पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्ते, पथदीप, गटारे व सुशोभीकरणाची कामे मार्गी; नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांची माहिती..
⚡वैभववाडी ता.२६-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वाभवे वैभववाडी नगरपंचायतीला नगरोत्थान मधून 3 कोटी 25 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत . या भरघोस निधीतून वैभववाडी शहरातील विविध विकास कामे केली जाणार आहेत.रस्ते, पथदीप, सुशोभीकरण, बंदिस्त गटारे अशा विविध कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन शहराला एक प्रकारे न्याय दिला आहे. अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ.श्रध्दा रावराणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा रावराणे बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. आता 3 कोटी 25 लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये वैभववाडी नगरपंचायत येथील सोलर हायमष्ठ पतदिव्य उभारणे व पाणीपुरवठा विहिरीवर ग्रीह आधारित सोलर यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये, प्रभाग क्रमांक 17 मध्ये सतीश रावराणे घर ते भैरू गुरखे घरापर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी 50 लाख, प्रभाग क्रमांक 17 मध्ये लांजवळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे 25 लाख, प्रभाग क्रमांक 1 मध्ये कलादालनाची सुधारणा करणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 10 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 16 मध्ये आंतरवाडी पर्यंत रस्ता तयार करणे 30 लाख, नगरपंचायत ते मच्छी मार्केट बंदिस्त गटार बांधणे 25 लाख आणि मच्छी मार्केट ते महाकाली कॉम्प्लेक्स पर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी 25 लाख, प्रभाग क्रमांक 1 मध्ये करंगुटकर घर ते बोभाटे घरापर्यंत रस्ता तयार करणे 30 लाख, प्रभाग क्रमांक 15 मध्ये अदिष्टी देवी मंदिर येथे सुशोभीकरण करणे 20 लाख, नगरपंचायत रस्त्यावरती थेरमो पॉइंट साठी 10 लाख रुपये, असा सुमारे 3 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.श्रध्दा रावराणे यांनी दिली.
