१२ कोटींच्या नगराध्यक्षांनी माझ्या भानगडीत पडू नये..

संजू परब यांचा पलटवार:सुट्टीवर असताना ऑनलाईन सभेला उपस्थिती कोणत्या नियमात?..?

⚡सावंतवाडी ता.२३- : नगराध्यक्ष मॅडम
सुट्टीवर असताना ऑनलाईन सभेला उपस्थित राहणे हे कोणत्या नियमात बसते, हे आधी जाहीर करावे आणि त्यानंतर आमच्यावर टीका करावी, असा पलटवार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्यावर केला.

ते म्हणाले, “सावंतवाडी नगरपालिकेत विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र शहरातील अग्निशमन बंबच बंद अवस्थेत आहे. त्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत,” असा टोला त्यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले, “जर ऑनलाईन उपस्थिती नियमबाह्य होती, तर संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा प्रभारी नगराध्यक्षांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? याचा अर्थ त्यांनाही हे नियमात बसत नसल्याची जाणीव आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्षांचेही मी अभिनंदन करतो,” असा उपरोधिक उल्लेख त्यांनी केला.तसेच नगरपालिकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर राजकीय स्वरूपाच्या पोस्ट टाकल्या जात असल्याचा आरोप करत, “जनसेवेच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या या पेजवर राजकारण कशासाठी? प्रशासनाने याची दखल घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.“नगराध्यक्षांनी उगाच माझ्या भानगडीत पडण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही १२ कोटींचे नगराध्यक्ष आहात,” असा टोला लगावत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

You cannot copy content of this page