Headlines

रेडी हुडावाडी जंगलमय भागात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची घटनास्थळी भेट

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हुडावाडी जंगलमय भागात आज मंगळवारी (दि. 10 नोव्हेंबर )दुपारी 2.30 वा. च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (वय सु. 45 ते 55)आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, कुडाळ पोलीस स्थानकाचे एपीआय श्री. मोरे, पोलीस हवालदार मंगेश जाधव, श्री. तांबे, महिला पोलीस हवालदार दीपा मठकर, श्री. लोके, श्री. कलगोंडा आदींनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला असुन पंचनामा प्रक्रिया सुरु आहे. याबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी श्री. भागवत तसेच सावंतवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत गोविंद मधुकर केरकर ( रा.आरोंदा, भटपावणी, ता. सावंतवाडी )यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात खबर दिली असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. वेंगुर्ला पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page