करूळ येथे वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला…

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद..

⚡कणकवली ता.२५-: तालुक्यातील करूळ गावात एका वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदाकिनी भिकाजी राणे (वय ८८, रा. माईन, घाडीवाडी, ता. कणकवली) या आपल्या बहिणीकडे करूळ येथे गेल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास करूळ येथील फोफेवाडी परिसरातील एका ग्रामस्थाच्या विहिरीच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत मयत मंदाकिनी राणे यांचे पुतणे मिलिंद कांशीराम राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली.

मंदाकिनी राणे या ९ फेब्रुवारी रोजी माईन येथून आपल्या बहिणीकडे करूळ गावात गेल्या होत्या. २३ फेब्रुवारी रोजी त्या करूळ येथून माईनकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्या घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर २५ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

मिलिंद राणे यांच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page