⚡मालवण ता.०७-:
गणेशोत्सवानिमित्त डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने मालवण बंदर जेटी या विसर्जनस्थळी निर्माल्यापासुन खत निर्मिती हा उपक्रम राबवून सुमारे एक टन निर्माल्य जमा करण्यात आले.
अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी मालवण बंदर जेटी येथे डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. हा उपक्रम संध्याकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये मालवण, चिंदर बैठक येथील पंचावन्न श्रीसदस्य उपस्थित होते. यावेळी गणेश भक्तांनी आणलेले निर्माल्य श्रीसदस्यांकडून संकलित करण्यात आले. यावेळी मालवण तालुक्यातील विविध भागातील श्री सदस्यही उपस्थित होते.
यावेळी या उपक्रमाचे जिल्हा संयोजक आशिष पाटील म्हणाले, मालवण बंदर जेटीसह तालुक्यातील इतर ठिकाणाहूनही निर्माल्य जमा करण्यात येत असून या निर्माल्या पासून खत निर्मिती केली जाणार आहे. हे खत धर्माधिकारी प्रतिष्ठानने विविध ठिकाणी लावलेल्या झाडांना घालण्यात येनरा आहे, असेही त्यांनी सांगितले. तर प्रतिष्ठानचे साधक सुधीर धुरी यांनी सर्व ठिकाणचे निर्माल्य गोळा करून त्यातील फुले, दोरे, काड्या यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांचे निर्माल्य जमिनीतील खड्ड्यात टाकून त्यामध्ये शेणखत व माती मिसळली जाते आणि त्यापासून खतनिर्मिती केली जाते. जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविला जात आहे, असे सांगितले.