⚡मालवण ता.०७-:
यंदाच्या गणेशोत्सवात वादळी वातावरणामुळे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जन करणे भाविकांसाठी आव्हान बनले असताना विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि आतू फर्नांडिस मित्र मंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला. त्यांनी बंदर जेटी किनाऱ्यावर एक विशेष पथक कार्यरत ठेवताना दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या गणपती मूर्तींचे मोफत आणि सुरक्षित विसर्जन केले.
यावर्षी गणेशोत्सव सुरू असतानाच समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाली. उंच लाटा आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भाविकांना समुद्रात उतरून विसर्जन करणे धोकादायक होते. हे लक्षात घेऊन हरी खोबरेकर मित्रमंडळाने तात्काळ पाऊल उचलले. त्यांनी तरुणांची दरवर्षी प्रमाणे एक टीम तयार केली. ज्यांनी स्वतःची सुरक्षा जपून भाविकांनी आणलेल्या गणेश मूर्ती समुद्रात सुरक्षितपणे विसर्जित केल्या. या पथकाने कोणतेही शुल्क न घेता नि:स्वार्थ भावनेने सेवा दिली. यामुळे शेकडो गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमामुळे मालवणमधील गणेश भक्तांनी हरी खोबरेकर मित्र मंडळाचे आभार मानले आहेत.
हरी खोबरेकर मित्र मंडळाने गणपती विसर्जनासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम अनेक वर्षे राबवत आहे. यावर्षीच्या पथकात सोमनाथ लांबोर, भावेश बटाव, ऋतिक बटाव, दीपक कदम, निखिल बटाव, प्रथमेश परब, संचित देसाई, एंजल फर्नांडिस, विल्सन परेरा, तेजस घारकर, आशिष फर्नांडिस, गणेश राणे, सोहम हिंदळेकर, प्रणव कदम, यश देसाई, संदीप देसाई, धनंजय साळगावकर, योगेश साळगावकर, अण्णा कदम, कार्तिक बटाव, तन्मय यमकर, रोशन कांबळी, भाविक देसाई, सागर झोरे, विकी लवंदे, साहिल लवंदे, संदेश झोरे, शुभम खरात, जॅकी परेरा, रॅक्स परेरा, तन्मय राणे, बबन वाघ, परेश वाघ, सागर झोरे, साई डोईफोडे, कार्तिक बटाव, शंकर बटाव, राजा बटाव, अमित आडवलकर, रोहित सकपाळ, मनीष शिंदे, श्रेयस लांबोर यांसारख्या अनेक तरुणांनी सहभाग घेतला.