कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर कला गौरव पुरस्काराने सन्मानित…

⚡मालवण ता.२५-:
देवरुख येथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुख यांच्यावतीने कला व शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कला शिक्षक श्री समीर चांदरकर यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले

देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुख यांच्यावतीने आयोजित ” संकल्पन “२०२६ अंतर्गत १९ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाले.
या वार्षिक कला प्रदर्शनाच्या अनुषंगाने DeCAD मार्फत दिला जाणारा वार्षिक “कला गौरव पुरस्कार” वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांना देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुखचे सचिव श्री. विजय विरकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल,श्रीफळ व रोख पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले

यावेळी पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार, श्री. कुडलय्या हिरेमठ जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे प्रा श्री. प्रफुल्ल सातोकर, प्राचार्य श्री रणजीत मराठे आदी मान्यवर उपस्थित होते .

समीर चांदरकर यांच्या कला व शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेत DeCAD कला महाविद्यालयाने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. कलाशिक्षक समीर चांदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेतील अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रशालेत अनेक उपक्रम राबवलेले आहेत.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला, शिक्षा मंत्रालय भारत सरकार NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फत आयोजित राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेत त्यांनी उडीसा भुवनेश्वर येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. समीर चांदरकर यांनी जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक रांगोळ्या साकारल्याआहेत , झी मराठी सोनी टीव्ही व इतर वाहिन्यांवरील रियालिटी शोमध्ये ही त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे.

यावेळी देवरुख कला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग , विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page