मालवणात मीनाताई ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी…!

⚡मालवण ता.०७-:
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची पुण्यतिथी शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, महिला उपतालुकाप्रमुख पूजा तोंडवळकर, शहर संघटक राजू बिडये, उपशहरप्रमुख कोचरेकर, शाखाप्रमुख संदीप मालंडकर, शिवाजी केळुसकर, युवती सेनेचे महिला जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, गीतांजली लाड, दीपाली कोथळलकर, दता नेरकर, पप्या फर्नाडिस व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page