Headlines

सावंतवाडी शहरात ११ दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन…

⚡सावंतवाडी ता.०६-: शहरासह ग्रामीण भागातील ११ दिवसांच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत वाजत गाजत निरोप देण्यात आला. गणेशभक्तांच्या जल्लोषात ठिकठिकाणी थाटामाटात विसर्जन करण्यात आले. शहरात ११ दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चितार आळी व नगरपरिषद व्यापारी संकुल येथील सार्वजनिक गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी साकारण्यात…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन प्रकृतीची केली चौकशी…

⚡मुंबई दि.०६-:माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. बरे होऊन रुग्णालयातून घरी अधिश निवासस्थानी परतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिश निवासस्थानी जाऊन भेट…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले महेश सारंग यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०६-: पालकमंत्री नितेश राणे यांनी आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या कोलगाव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे घेतले दर्शन. यावेळी सारंग कुटुंबियांनी पालकमंत्री राणी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राणे यांनी देखील कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Read Full News

राजू देसाई व देविदास प्रभुगांवकर यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.०५-:सावंतवाडी येथील दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शिक्षक दिनानिमित्त गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये मालवण तालुक्यातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल, मालवण चे शिक्षक श्री. राजू भाऊसाहेब देसाई व मालवण रेवतळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. देविदास प्रभुगांवकर यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप…

Read Full News

व्हायरल व्हिडीओतून हायस्पीड नौकांचे अतिक्रमण आले समोर…

⚡मालवण ता.०५-:जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड मासेमारी नौकांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत पारंपारिक मच्छिमारांकडून सातत्याने आवाज उठविला जात असताना या हायस्पीड नौकांची समुद्रातील दादागिरी दर्शविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुमारे सात ते आठ हायस्पीड नौका दिसत असून पारंपारिक मच्छिमारानी समुद्रात टाकलेल्या जाळीवरून हायस्पीड नौका नेऊ नये अशी विनंती पारंपारिक मच्छिमार…

Read Full News

चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर कणकवली पोलिसांनी पकडला…

५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त.. कणकवली : विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर ( एमएच ०७ – एजे ६७५७) कणकवली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेंद्र नानचे यांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता लक्ष्मी चित्रमंदिर नजीक पकडला. ४ सप्टेंबर रोजी आचरा कणकवली रस्त्यावर कणकवली च्या दिशेने सदर डंपर वाळू वाहतूक करत होता. एपीआय नानचे यांनी डंपर…

Read Full News

श्रावण येथे लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा संचार…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील श्रावण येथे आज पहाटे ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास श्रावण येथील लोकवस्तीच्या ठिकाणी रस्त्यावर संचार करताना हा बिबट्या दिसून आल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मालवण तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्यांचा संचार सुरु असताना श्रावण गावातही बिबट्याचा संचार सुरु असल्याचे समोर आले आहे. श्रावण येथील…

Read Full News

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत गुरुवारी ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे तीन महिलानी रक्तदान केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. याच काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर…

Read Full News

पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०५-:राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.

Read Full News

बांदा शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी…!

⚡बांदा ता.०५-: पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त बांदा शहरात ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी भव्य रॅली काढली.सकाळपासूनच मशिदींमध्ये नमाज पठण करून विशेष दुआ करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅलीला सुरुवात झाली. हातात झेंडे, बॅनर व आकर्षक फलक घेऊन निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते….

Read Full News

You cannot copy content of this page