मनसे तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांचा आरोप..

⚡मालवण ता.०४-:
मालवण तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या पीक-पाणी नोंदी सातबाऱ्यावर करण्याबाबत तलाठी कार्यालयांकडून टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी कार्यालयांकडे अर्ज करूनही त्यांच्या पीक-पाणी नोंदी अद्याप झालेल्या नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे
पत्रकात म्हटले आहे की, पीक-पाणी नोंद ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, विविध शासकीय योजना, पीकविमा तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी या नोंदींचे महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. संबंधित तलाठ्यांनी शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर न केल्यास या प्रश्नावर तालुकास्तरावर मनसेच्या वतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा मनसे मालवण तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे
