कुडाळ : सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत गुरुवारी ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे तीन महिलानी रक्तदान केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. याच काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवाशांची संख्याही वाढल्याने रक्ताची मागणी प्रचंड वाढलेली असते. सध्या जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग मिल्लत फाऊंडेशनतर्फे दि.
१८ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल ५० रक्तदात्यांनी बहुमोल रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली होती.
सिंधुदुर्ग मिल्लत फाऊंडेशन दरवर्षी जिल्ह्यात नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असते. त्याच परंपरेत गुरुवार दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नेरूर, सरंबळ, सोनवडे, दुर्गवाड आणि पंचक्रोशीतील तरुणांनी या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये ३ महिला रक्तदात्यांसह एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान करत गणेशोत्सव आणि इद-ए-मिलाद चा सण खऱ्या अर्थाने प्रवित्र सामाजिक सत्कार्य करत साजरा केला. ८ महिलांसह एकूण ५१ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी यावेळी रक्तदानासाठी नावनोंदणी केली होती. त्यापैकी एकूण ३९ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले . फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड तर्फे मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला .
रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी फ्रेंड्स ग्रुप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य मस्जिद, मदरसा कमीटीना मार्गदर्शन करत प्रोत्साहीत केल्या बद्दल ग्रुप च्या वतीने माजी सरपंच श्री. समद मुजावर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन चे श्री. एजाज अश्रफहुसेन नाईक यांचा ऋद्य सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना एजाज नाईक यांनी रक्तदानाचे महत्व विषद केले आणि दर्गाह, मस्जिद, मदरसा या ठिकाणी आयोजित होत असलेल्या रक्तदान शिबीरांद्वारे सामाजिक एकोपा जपत सर्वधर्मीय रक्तदाते एकत्र येतात हे उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सायकॉलॉजीस्ट कु. रूफा नाईक यांनी देखील रक्तदान शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले आणि समाजाने रक्तदानासारखे चांगले उपक्रम राबवत आरोग्यदायी समाजव्यवस्था निवडावी असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते श्री. रूपेश पावसकर, श्री. म्हाडदळकर, मॅक्सी पिंटो, ॲडव्होकेट सौ. नाझनीन एजाज नाईक, आदीनी रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ८ महिलांनी नावनोंदणी केली होती त्यापैकी ३ जणांनी रक्तदान केले .
या शिबिराचे उदघाटन रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ संकेत लंगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी नेरूरचे माजी उपसरपंच श्री. समद मुजावर, कुडाळचे माजी नगरसेवक श्री. एजाज नाईक, श्री. मुश्ताक नाईक, श्री. आजीम मुजावर, सौ. झाकीरा शायर खान, बशीर मुजावर, जोहेल नाईक, अनिस शाह, शायर खान, निझाम खान, बदर मुजावर, मकबूल मुजावर, मनसुर ख्वाजा, महेक ख्वाजा, आसिफ खान, नईम शेख , अब्दुल शहा, रफिक मुजावर, इद्रूस मुजावर, अनफाल खान,
तबरेज खान, दिनेश साळुंखे, सलमान मुजावर, फिरोज खतीब, समीर मुजावर, किशोर वरक, अक्षय वरक, अजय झोरे, बाबुराव वरक, नफीस शेख, उझेर मुजावर, रमीझ मुजावर, प्रकाश धुरी, दत्ताराम म्हाडदळकर, जोहेल नाईक, शादत नाईक, सदफ खान, फैझ मुजावर, इमरान मुजावर, मोहम्मद गोलंदाज, साजिद शहा, अब्दुल्ला मुजावर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी रक्तपेढी चे कर्मचारी श्री. साई सावंत – रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी, श्री. नितीन तूरनर – समाजसेवा अधीक्षक, श्रीमती नीता आरोलकर – अधिपरिचारिका, श्रीमती प्रांजली पावसकर – रक्तकेंद्र तंत्रज्ञ, श्रीमती ऋतुजा हरमळकर – रक्तकेंद्र सहाय्यक , श्री. विजय निरुखेकर – रक्तकेंद्र परिचर , श्री. गणपत गाडगे – रक्तकेंद्र परिचर, श्री. नितीन गांवकर – रक्तकेंद्र वाहनचालक यांचा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
