देवगड किनाऱ्यावर सीमाशुल्क विभागाची कारवाई…

एलईडी (LED) सुसज्ज तीन मासेमारी नौका अडवल्या..

देवगड | दि. 24 फेब्रुवारी 2026
देवगड किनारपट्टीवर सीमाशुल्क प्रतिबंधक पथक, सिंधुदुर्ग विभाग यांच्यामार्फत नियमित दिवस समुद्र गस्तीदरम्यान देवगड किनाऱ्यालगत भारतीय प्रादेशिक पाण्यात (12 नॉटिकल मैलांच्या आत) एलईडी सुसज्ज तीन मासेमारी नौकांची अडवणूक करून तपासणी करण्यात आली.
ही कारवाई श्री. पवनकुमार राठी ,अधीक्षक (प्रतिबंधक व गुप्तवार्ता) श्री पारस जैन निरीक्षक, श्री. दिपक गायकवाड ,निरीक्षक तसेच मरीन कस्टम्स पथकातील श्री. तानाजी, श्री विष्णू , श्री. रोहन व श्री. किरण यांनी संयुक्तपणे केली.

कारवाईदरम्यान संबंधित नौकांवर उच्च क्षमतेचे एलईडी दिवे (CN बल्ब), फिशिंग लॅम्प, एलईडी मोठे दिवे, नाईट बॅलेस्टर, पाण्याखालील दिवे तसेच उच्च क्षमतेचे जनरेटर सेट (GENSET) बसवलेले आढळून आले. प्राथमिक चौकशीत संबंधित नौका मागील काही वर्षांपासून एलईडी पद्धतीने मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान नौकाधारकांकडून नौकेची नोंदणी प्रमाणपत्रे, मासेमारी परवाना, खलाशी जाहीरनामा अथवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. तथापि, सीमाशुल्क अधिनियम, 1962 अंतर्गत कोणताही तस्करीचा किंवा प्रतिबंधित माल आढळून आलेला नाही.

ही बाब मत्स्य व्यवसाय नियमांशी संबंधित असल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांना कळविण्यात आले असून संबंधित तिन्ही नौका देवगड कस्टम जेटीवर आणून त्यांच्यावरील आवश्यक तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभाग समुद्र मार्गे होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींवर सातत लक्ष ठेवून नियमित गस्त व तपासणी करत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सीमा शुक्ल विभागाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

You cannot copy content of this page