वायंगणी उपसरपंचपदी भाजपच्या अनंत केळजी यांची‌ बिनविरोध निवड…

वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीने सन्मान..

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या अनंत सीताराम केळजी यांची‌ बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रवींद्र धोंड यांनी 9 जानेवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर आज
मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.सरपंच अवी दुतोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यासी अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी मधुकर नवार यांच्या उपस्थितीत ही बिनविरोध निवड प्रक्रिया संपन्न झाली.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे सरपंच दत्ताराम (अवि) दुतोंडकर यांनी अभिनंदन केले. यावेळी कार्यकारिणी सदस्य महेश मुणनकर, विनू मठकर, दिपाली नांदोसकर, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड, ग्राम महसुल अधिकारी गौरी पराडकर, माजी उपसरपंच हर्षद साळगांवकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधुत राऊत, ग्रामस्थ शेखर तोरसकर, ग्रामपंचायत लिपिक महेश गावडे, शिपाई सत्त्वशिल परब, संगणक चालक सुवर्णा मसुरकर आदी उपस्थित होते. उपसरपंच निवड जाहीर होताच वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष पपू परब, भाजपा तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, मारुती दोडानशेट्टी, अवधूत राऊत यांनी उपसरपंच अनंत केळजी यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा पक्ष वेंगुर्ला तालुक्यात अधिक वेगाने विस्तारत असल्याची प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी बोलताना दिली.

You cannot copy content of this page