Headlines

पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०५-:राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.

Read Full News

बांदा शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी…!

⚡बांदा ता.०५-: पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त बांदा शहरात ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी भव्य रॅली काढली.सकाळपासूनच मशिदींमध्ये नमाज पठण करून विशेष दुआ करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅलीला सुरुवात झाली. हातात झेंडे, बॅनर व आकर्षक फलक घेऊन निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते….

Read Full News

अबिद नाईक यानी कणकवली शहरातील मानाच्या संतांच्या गणपतीचे घेतले दर्शन…!

⚡कणकवली ता.०५-: कणकवली शहरातील टेंबवाङी येथे मानाचा नवसाला पावणारा संतांचा गणपती बाप्पा यांचे दरवर्षीप्रमाणे दर्शन आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनीगणपती बाप्पाला फुलांचा हार अर्पण करून दर्शन घेतले त्यावेळी गार्‍हाणं घालताना सर्वांना सुखी, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना केली त्यावेळी संतांच्या गणपतीचे मानकरी सुनील सावंत यांनी अबिद नाईक यांचा गार्‍हाणं घालून यथोचित सन्मान…

Read Full News

सावंतवाडी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले विनायक राऊत यांच्या गणपतीचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या गणपतीचे आज सावंतवाडी मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत दर्शन घेतले. यावेळी राऊत यांनी पदाधिकारी यांच्यासोबत आगामी स्थानिक निवडणुका संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राहू त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी विधान सभा प्रमुख रुपेश राऊळ, सरपंच गुणाजी गावडे, सुनील…

Read Full News

कवी सफरअली इसफ यांना “सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार’…

⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या “अल्लाह ईश्वर” या काव्यसंग्रहासाठी “सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार” प्राप्त झाला होता. नुकताच चिपळूण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर काव्य पुरस्काराने कवी इसफ यांचा गौरविण्यात आला. चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात हा कायक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले होते. सह्याद्री…

Read Full News

गांजाची देवाणघेवाण करताना देवगडात चौघांना रंगेहाथ पडकले…

▪️२ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई.. ⚡देवगड ता.०५-: देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. मिलिंद महादेव कुबल (५६, रा. आनंदवाडी- देवगड), मनोज वसंत जाधव (५०, रा. देवगड किल्ला-देवगड), सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (२५, रा. तारकर्ली…

Read Full News

सावंतवाडी सर्वेदेनगर परिसरात बंद घर चोरट्यानी फोडले…!

घटनास्थळी पोलीस दाखल:अधिक तपास सुरू ⚡सावंतवाडी ता.०५-: येथील सर्वेदेनगर परिसरात बंद घरात अज्ञात चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित घरातील कुटुंबीय हे गणेश चतुर्थी निमित्त चौकुल येथे गेले, त्यामुळे ते घर बंद होते. मात्र…

Read Full News

जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांसाठी एकूण २१ प्रस्ताव प्राप्त झाले होते.यापैकी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे ८ शिक्षकांची निवड या पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०४-: आमदार दीपक केसरकर यांनी आज मडुरा येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे घेतले दर्शन. यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांनी ‘बांद्याच्या बाप्पा’चे घेतले दर्शन…!

⚡बांदा ता.०४-: राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेतले.आमदार केसरकर हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दर्शनाला उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांनी केसरकर यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी श्री स्वार यांच्यासह सुशांत पांगम, भाऊ वाळके, संदेश पावसकर, दत्तप्रसाद पावसकर,…

Read Full News

You cannot copy content of this page