⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या गणपतीचे आज सावंतवाडी मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत दर्शन घेतले. यावेळी राऊत यांनी पदाधिकारी यांच्यासोबत आगामी स्थानिक निवडणुका संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राहू त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
यावेळी विधान सभा प्रमुख रुपेश राऊळ, सरपंच गुणाजी गावडे, सुनील गावडे, नामदेव नाईक, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, नेमळे उप सरपंच सखाराम राऊळ, सचिन मुळीक, सुभाष राऊळ, नितीन पांगम वासुदेव राऊळ प्रणय नाईक, राजेश भैरे, आदी उपस्थित होते.