⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या “अल्लाह ईश्वर” या काव्यसंग्रहासाठी “सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार” प्राप्त झाला होता. नुकताच चिपळूण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर काव्य पुरस्काराने कवी इसफ यांचा गौरविण्यात आला. चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात हा कायक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले होते. सह्याद्री समाचारतर्फे हा कार्यक्रम झाला. यावेळी कादंबरीकार प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कवी भालचंद्र सुपेकर, सह्याद्री समाचारचे प्रमुख शाहीर शाहिद खेरटकर, माजी सैनिक संतोष मोहिते, प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. गोपीचंद वाघमारे आदी उपस्थित होते. कवी सफरअली इसफ यांचा अल्लाह ईश्वर हा काव्यसंग्रह बहुचर्चित असून यापूर्वी या काव्यसंग्रहाचा समाज साहित्य प्रतिष्ठानचा प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार, प्रभा प्रकाशनाचा प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार, कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मस्तरांची सावली काव्य पुरस्कार,यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार, वसंत- कमल काव्य पुरस्कार, सम्यक संबोधी काव्य पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात झाले आहे.त्यानंतर आता सदर कवितासंग्रहाचा सह्याद्री साहित्य काव्य पुरस्काराने या काव्यसंग्रहाचा गौरव करण्यात आला आहे.
कवी सफरअली इसफ यांना “सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार’…
