▪️२ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई..
⚡देवगड ता.०५-: देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. मिलिंद महादेव कुबल (५६, रा. आनंदवाडी- देवगड), मनोज वसंत जाधव (५०, रा. देवगड किल्ला-देवगड), सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (२५, रा. तारकर्ली काळेथर-मालवण), गौरव विनोद पाटकर (२२, रा. वायरी आडवण) अशी संशयितांची नावे आहेत. या कारवाईत संशयितांकडून तीन हजार रुपयांच्या ९५ ग्रॅम गाजांसह दोन दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितांविरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवगड परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, विल्सन डिसोझा, प्रकाश कदम, आशिष जमादार, महेश्वर समजीस्कर यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास देवगड पोलीस करीत आहेत