५७ कोटींच्या नळपाणी योजनेवर प्रश्नचिन्ह; कामाच्या गुणवत्तेबाबत संजू परब यांचा आक्षेप…

सावंतवाडी : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण घेतला. पण, हे काम बघतय कोण ? बांधकाम विभाग हे काम बघत असल्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आक्षेप घेतला.

५७ कोटीच सुरू असणार २० टक्के काम योग्य झालंय का ? बांधकामच्या अधिकाऱ्यांना हे काम जमणार का ? त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी यांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी श्री. परब यांनी केली. ५७ कोटी खर्च करून घरोघरी पाणी पुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी देखील त्याला निवृत्त पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच मार्गदर्शन यात घेण्याची सुचना केली.

You cannot copy content of this page