⚡बांदा ता.०४-: राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेतले.
आमदार केसरकर हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दर्शनाला उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांनी केसरकर यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी श्री स्वार यांच्यासह सुशांत पांगम, भाऊ वाळके, संदेश पावसकर, दत्तप्रसाद पावसकर, भैय्या गोवेकर, सर्वेश गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, बाबा काणेकर, प्रथमेश गोवेकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर श्री केसरकर यांनी शहरातील हनुमान मंदिरातील गणरायाचे देखील दर्शन घेतले.
फोटो:-
बांदा येथे बांद्याच्या बाप्पाचे दर्शन घेताना दीपक केसरकर. सोबत मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
आमदार दीपक केसरकर यांनी ‘बांद्याच्या बाप्पा’चे घेतले दर्शन…!
