माजी आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा उपक्रम..

⚡कणकवली ता.२१-: हळवल येथील गणपती साना परिसरात गडनदी पात्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वनराई बंधारा उभारण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने हळवल गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हा उपक्रम राबविला. या बंधाऱ्याचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
गडनदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकून हा बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हळवल गावातील पाणीप्रश्नाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन केलेल्या या कामाबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, राजू राणे, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, ग्रामपंचायत सदस्य रोहित राणे, अनंत राणे, उत्तम राणे, गणेश राणे, सुभाष परब, श्याम तांबे, प्रभाकर चव्हाण, रवी परब, विजय परब, कमलाकर तांबे, प्रशांत परब, आप्पा ठाकूर, सुभाष राणे, निलेश ठाकूर, भाई तावडे, नंदू परब आदी शिवसैनिक व हळवल ग्रामस्थ उपस्थित होते.
