बांदा शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी…!

⚡बांदा ता.०५-: पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त बांदा शहरात ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी भव्य रॅली काढली.
सकाळपासूनच मशिदींमध्ये नमाज पठण करून विशेष दुआ करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅलीला सुरुवात झाली. हातात झेंडे, बॅनर व आकर्षक फलक घेऊन निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. महिला व लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रॅलीदरम्यान धार्मिक नारे, पैगंबरांवरील काव्यपठण, तसेच बंधुभावाचा संदेश देणारे उपदेश यामुळे वातावरण भारावून गेले होते. शहरातील अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. फुलांची उधळण करून रॅलीचे स्वागत करण्यात आले.
रॅलीचा समारोप सामूहिक प्रार्थना करून करण्यात आला. यावेळी सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सद्भावना, ऐक्य आणि शांततेचा संदेश देत हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
ओवेस कॉम्प्लेक्स येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व धार्मियांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलेत. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ट्रस्टचे अध्यक्ष आदम आगा, कुटुबुद्दीन शेख, उपाध्यक्ष सुलेमान शेख, हुसेन खान, शाहिद शेख, युसूफ शेख, हुसेन मकानदार, शेखअजमुद्दीन सरगुरू, जुबेर खतीब, कायेश खान, सुन्नत खान, दिलनवाज शेख, जुबेर खान, परवेझ खतीब , बशीर सय्यद, मोहम्मद आगा, फयाज आगा, सोहेल जमादार, युसूफ शेख आदिसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत कबूतर व फुगे सोडण्यात आले.
. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, साई काणेकर, ज्ञानेश्वर सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रीतम हरमलकर, प्रशांत पांगम, सुनील धामापूरकर, अजय महाजन यांचे सत्कार करण्यात आले.
फोटो:-
बांदा येथे ईद निमित्त कबुतर व फुगे सोडण्यात आले. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page