शहरातील भोसले उद्यात पार्कींगच्या बाजुला असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंच नकोच…

अजय गोंदावळे यांची मागणी:तर याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, ॲड.निरवडेकर यांच आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील भोसले उद्यात पार्कींगच्या बाजुला असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंच नकोच अशी भुमिका विरोधी शिंदे सेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनी मांडली.

याठिकाणी कायमस्वरुपी रंगमंच उभारणीसाठी आलेल्या प्रस्तावावर उद्यान सभापती मोहीनी मडगावकर यांनी आज पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत विषय मांडला असता यावर चर्चा झाली. दरम्यार शहरातील हे सुस्थितीत असलेले एकमेव उद्यान असून त्याठिकाणी दररोज अनेक नागरिक व पर्यटक भेट देतात असा ठिकाणी रंगमंच उभारुन उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचवू नका अशी भुमिकाही यावेळी नगरसेवक संजू परब यांनी घेत नगरसेवक गोंदावळे यांना समर्थन दिले. दरम्यान या संदर्भात योग्य निर्णय चर्चेअंती घेण्यात येईल असे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page