नट वाचनालय, बांदा येथे ‘मराठी भाषा गौरवदिन’ निमित्त विशेष कार्यक्रम…

⚡बांदा ता.२४-: मराठी भाषेचा गौरव आणि जतन करण्याच्या उद्देशाने थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून नट वाचनालय, बांदा येथे शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानिमित्त “माझ्या आठवणीतील कविता” या संकल्पनेवर आधारित कविता गायनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मराठी साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या आवडत्या कविता सादर कराव्यात, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. ज्यांना आपली कविता सादर करावयाची आहे, त्यांनी आपली नावे नट वाचनालयात दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत नोंदवावीत, असेही कळविण्यात आले आहे. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी हा कार्यक्रम एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page