मुंबईच्या समुद्रात 41 मिनटात 5 किलोमीटर अंतर केले पार..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-:
मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात पार पडलेल्या राष्ट्रीय संक रॉक ओशन स्विमथॉन या सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पुर्वा संदीप गावडे हिने 41.16 मिनटात 5 किलोमीटर अंतर पार करत दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले आहे.दुसऱ्या क्रमांकाची ती वेगवान जलतरणपटू ठरली आहे.पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र अमेच्यअर एकवाटीक असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे सेक्रेटरी राजू पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली 62 वी संक रॉक ओशन स्विमथॉन ही राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा रविवारी मुंबईच्या समुद्रात पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रासह सहा राज्यातील विविध गटात 330 जलतरणपटू सहभागी झाले होते लाटावर स्वार होत सर्वच स्पर्धकांनी विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली
या सागरी जलतरण स्पर्धेत मुलींच्या गटातून सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने दमदार कामगिरी करत मुंबईच्या समुद्रात 41. 16 मिनटात 5 किलोमीटर अंतर पार करत रौप्य पदक पटकावले आहे व ती दुसऱ्या क्रमांकाची वेगवान जलतरणपटू ठरली पूर्वाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र अमेच्यअर एकवाटीक असोसिएशनचे असोसिएशनचे सेक्रेटरी राजू पालकर यांनी खास अभिनंदन केले आहे सद्या ती पुणे बालेवाडी येथे जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे
