⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चाच्या सावंतवाडी शहराध्यक्षपदी अमित नागेश गवंडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश रघुनाथ सावंत यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.

किसान मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, गवंडळकर यांच्यावर सावंतवाडी शहरातील किसान मोर्चाचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीबद्दल अमित गवंडळकर यांचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन होत आहे. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार शेतकरी व कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
