⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून,अजय गोविंद सावंत यांची किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप किसान मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष उमेश रघुनाथ सावंत यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा श्री. रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

शेतकरी व कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत संघटनात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी अजय सावंत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी वर्गातून अभिनंदन होत आहे.
