Headlines

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बांद्यात ज्येष्ठांचा सन्मान

बांदा/प्रतिनिधी
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीच्या वतीने गुरुवार दिनांक ८ रोजी सायंकाळी ३.३० वाजता ग्रामसचिवालय बांदा येथील सभागृहात ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या समस्या, अनुभव आणि सामाजिक सहभागाबाबत विचारविनिमय होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीचे अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी ज्येष्ठ नागरिक सभासदांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page