चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर कणकवली पोलिसांनी पकडला…

५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली : विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर ( एमएच ०७ – एजे ६७५७) कणकवली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेंद्र नानचे यांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता लक्ष्मी चित्रमंदिर नजीक पकडला. ४ सप्टेंबर रोजी आचरा कणकवली रस्त्यावर कणकवली च्या दिशेने सदर डंपर वाळू वाहतूक करत होता. एपीआय नानचे यांनी डंपर चालक नंदू किसन पवार याच्याकडे वाळू वाहतूक परवान्याची चौकशी केली असता परवाना नसल्याचे उघड झाले. कणकवली पोलीस ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नाली कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नंदू पवार विरोधात बी एन एस चे कलम ३०३० (२), मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम ५० / १७७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page